हो, हीच वेळ आहे एका ब्रेकची
हे न्यूज चॅनल्समधील कथा देण्याचं एक कारणही आहे. काचेच्या केबिनच्या मागे किती असंतोष आहे, किती राग आहे, फ्रस्टेशन आहे हे तुम्ही यातून अनुभवू शकाल. मार्क्सचं म्हणणं आहे की, थिसिसच्या मध्येच अँटीथिसिस जन्म घेतो. तोच कालांतराने थिसिसला उदध्वस्त करतो. ही द्वंद्वात्मकता या कथांची मूळ प्रेरणा आहे. इथेही एक दिवस पापाचा घडा भरेल… पण सध्यातरी ही वेळ आहे एका ब्रेकची.......